सहज सोपे उपक्रम

माझी बँक

विद्यार्थ्यांना पालक खाऊसाठी काही पैसे देत असतात किंवा काही भागात विद्यार्थी शाळा सुटल्यावर काही कामे करतात . उदा . कापूस वेचणी ,बोर वेचणी,इ . तसेच कोणी पाहुणे मंडळी आल्यास तेही मुलांना थोडेसे पैसे देतात .
असे पैसे आपण जर विद्यार्थ्यांची बँक बनवून त्यात ठेवले तर मुलांना योग्य वेळी ते पैसे करता येतील . शालेय साहित्य खरेदी करता येईल . त्यासठी स्वतंत्र रजिष्टर करून त्यात मुलांची खाती काढता येतील . शक्य झाल्यास त्यांना पासबुक ची पण व्यवस्था करता येईल. व्यक्तिपरत्वे या उपक्रमात बदल करता येईल. व मुलांना बचतीची सवय तसेच बँकेचे कामकाज समजावून देत येईल .


शालेय वस्तू भांडार

आपल्या शाळेतील मुलांसाठी वही ,पेन , पेन्सील ,कंपासपेटीतील साहित्य ,खोडरबर साहित्य आपण विकत आणून ठेवू शकतो .टे साहित्य मुलांना माफक दरात म्हणजे न नफा न तोटा या तत्वावर विकत देवू शकतो . या उपक्रमात मुलेच नियंत्रण ठेवतील त्याचा जमा खर्च मुलेच पाहतील .
याच फायदा असा होईल की मुलांना अल्प दरात शालेय साहित्य मिळेल . व व्यापार कसा करावा याचेही ज्ञान मिळेल .

जो दिनांक तो पाढा


मित्रांनो विद्यार्थ्यांना पाढे पाठ असणे फार महत्वाचे असते .
विद्यार्थ्यांना पाढे पाठ करणे अवघड जात असेल तर जो दिनांक असेल तो पाढा त्या दिवशीच्या परिपाठ मध्ये सामाविष्ट करावा व तो पाढा सर्वाना पाठ करून यायला सांगावे .जेणे करून एका महिन्यात ३० पर्यंत पाढे पाठ
होतील . पुढच्या महिन्यात त्या पाढ्यांची परत उजळणी होईल .


इंग्रजी वर्तमानपत्र
मित्रांनो आपण आपल्या शाळेत मराठी वर्तमानपत्र न वापरता इंग्रजी वर्तमानपत्र वापरल्यास
विद्यार्थ्यांना इंग्रजीची भीती कमी होण्यास मदत होते .

इंग्रजी पेपरकडे कदाचित सुरुवातीला मुले दुर्लक्ष करतील नंतर हळूहळू त्यातील चित्र पाहतील
नंतर ठळक बातम्या वाचण्याचा प्रयत्न करतील व नंतर सरावाने इंग्रजी पेपर वाचायला सुरुवात करतील .
चित्रांचा व बातमीचा मेळ घालू लागतील .

परिणाम इंग्रजी विषयाची आवड निर्माण होईल .


रंगभरण व चित्रकला स्पर्धा


विध्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी त्यांना वेगवेगळी चित्रे काढता येणे. ते चित्रे यौग्य रंगसंगतीने रंगवता येणे आवश्यक असते. मुलांना मूलतः चित्रकलेची आवड असते. त्यासाठी आपण त्यांना नेहमी चित्रे काढून रंगवायला देऊ शकतो. वेगवेगळ्या सामाजिक संस्था या रंगभरण स्पर्धा घेतात. त्यात सहभाग घेऊन आपण विध्यार्थ्यांना त्यातला आनंद देऊ शकतो.
वरच्या वर्गासाठी आपण चित्रे काढण्याची स्पर्धा पण घेऊ शकतो. त्यामुळे मुलांना आनंद तर मिळेलच आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हायला मदत होते
.


वैयक्तिक स्वच्छता


विद्यार्थ्यांना आपण नेहमी स्वच्छतेचे महत्व पटउन देत असतो. वेळोवेळी नखे कापणे , केस कापणे , दात घासणे , नियमित आंघोळ करणे
हात स्वच्छ धुणे अशा सूचना वारंवार द्याव्यात. आठवड्यातून एक दिवस ठरवून आपण १००% सर्व विद्यार्थ्याची स्वच्छतेची तपासणी परिपाठ
झाल्यावर करू शकतो.
त्यामुळे विध्यार्थी साहजिकच स्वच्छ राहण्याचा प्रयत्न करतील. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या लहान भावंडांची स्वच्छतेविषयी काळज
घेण्यास प्रवृत करावे. 



गृहपाठ तपासणी पथक

आपण विध्यार्थ्यांना नेहमी गृहपाठ देत असतो. दुसऱ्या दिवशी सर्वांचा गृहपाठ तपासणे शाळा मोठी असल्यास अवघड जाते. आणि जर आपण दररोज गृहपाठ नाही तपासला तर काही विध्यार्थी गृहपाठ पूर्ण करणार नाहीत.
त्यासाठी आपण आपला वेळ वाचवा आणि गृहपाठ ही तपासला जावा यासाठी वर्गातील काही हुशार मुलांची गृहपाठ तपासणी पथकावर नेमणूक करू शकतो. हे पथक शाळा भरण्यापूर्वी गृहपाठ तपासण्याचे काम पूर्ण करू शकतात.
यामुळे आपला वेळ वाचतो आणि गृहपाठ तपासण्याचे कामही पूर्ण होते



मोठ्यांनी लहानांचा अभ्यास घेणे

आपल्या वर्गात जे मुले शिकत असतात त्यांची लहान भावंडे आपल्या शाळेत खालच्या वर्गात शिकत असतात किंवा बालवाडीत असतात. अश्या मुलांना शाळा सुटल्यावर मार्गदर्शन करण्याचे काम मोठी मुले करू शकतात.
त्यांचा आभ्यास घेणे , वाचन लेखनाचा सराव घेणे अश्याप्रकारे सरावाने लहान मुलांना अभ्यासाची गोडी लागण्यास मदत होते. कारण लहान मुले ही मोठ्या मुलांचे अनुकरण करत असतात.
 


नवागत स्वागत


नवागत स्वागत
आपल्या शाळेत प्रथम दाखल होणारी मुले निरागस असतात. जास्त वेळ ते आपल्या आईपासून दूर राहिलेले नसतात. तसेच काही मुलांच्या मनात
शिक्षकाविषयी आणि शाळेविषयी भीती असते. त्यांचे मन शाळेत रमेल किवा नाही हे आपण सांगू शकत नाही.
त्यासाठी शाळेत दाखल झालेल्या मुलांचे पहिल्या दिवशी फुले देऊन स्वागत करावे. वर्गसजावट करावी.
मुलांसाठी त्या दिवशी चांगले मनोरंजन करणारे खेळ घ्यावे. मुलांना गाणी गप्पा गोष्टी यात रमवावे.
जेणेकरून दिवसभर मुलांना घराची आठवण होणार नाही आणि शाळेविषयी आवड निर्माण होईल.



शब्दांच्या भेंड्या

शब्दांच्या भेंड्या
आपण पाहतो मुलांना इंग्रजी शब्द पाठ करणे अवगड जाते किवा त्यांना इंग्रजी शब्दांची भीती वाटते.
जर आपण इंग्रजी शब्दांच्या भेंड्या आपण घेतल्या तर मुले जिंकण्याच्या उद्देशाने जास्त इंग्रजी शब्द पाठ करतील.
या ठिकाणी आपण इंग्रजी शब्दांच्या एवजी गावांची नावे किवा माणसांची नावे असा बदल करू शकतो.
त्यामुळे मुलांचा शब्दसंग्रह वाढण्यास मदत होते.
 


1 comment:

  1. धन्यवाद सर... अतिशय उपयुक्त आणि मार्गदर्शक

    ReplyDelete